Blogs

Bandhkam Kamagar
मारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार नियमन व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ (१९९६ चा २७) च्या कलम ६२ व कलम ४० द्वारे प्रदान करण्यात आलेल्याअधिकाराचा वापर करुन, महाराष्ट्र शासनानेमहाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार ( रोजगार नियमन व सेवाशर्ती ) नियम, २००७ तयार केले असून, दिनांक १ मे २०११ रोजी त्रिपक्षीय महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ या त्रिपक्षीय मंडळाची स्थापना केलेली आहे. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण उपकर अधिनियम, १९९६ च्या कलम ३ (१) अनुसार व केंद्र शासनाच्या कामगार मंत्रालयाने निर्गमित केलेल्या दि. २६ सप्टेंबर १९९६ च्या अधिसूचनेनुसार, जमिनीची किंमत वगळून बांधकाम खर्चाच्या १% दराने उपकर वसूल केला जात आहे. सदरील उपकर वसुलीसाठी बांधकामास परवानगी देणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय कार्यालये व शासकीय उपक्रम यांच्या अधिकाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत तसेच महाराष्ट्र शासन, उद्योग, उर्जा व कामगार विभाग यांच्या दि. १६ एप्रिल २००८ रोजीच्या अधिसूचने अन्वये या विभागातील अधिकाऱ्यांची उपकर वसुली अधिकारी, निर्धारण अधिकारी व अपिलीय प्राधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे
Bandhkam Kamagar

Recommended Business

Categories
No Man flag